WATCH : सांगलीतील वाळव्यात शेतात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण


विशेष प्रतिनिधी

सांगली :- सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येलूर शिवेवर दोन दिवसापासून बिबट्या असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. आज जाधव मळा परिसरात ऊसतोड सुरू होती… त्याठिकाणी  ऊसमोळी वर बिबट्या बसला होता. त्याला पाहून एकच आरडा ओरडा सुरू केल्याने बिबट्या शेजारील शेतात पळून गेला. Leopard sightings in a dry field in Sangli; An atmosphere of fear among the citizens

दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.यावेळी येलुरचे माजी सरंपच राजन महाडिक यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. आज ऊसतोड सुरू असताना बिबट्याने दर्शन दिले होते तर दुपारी कुरळप येथील  पेठकर यांच्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाळवा तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे.. याच पार्श्वभूमीवर येथील जाधव मळा याठिकाणी बिबट्या असल्याच्या बातम्या सोशल मीडियातून गावात पसरल्या होत्या. त्याची पावले उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर पसरल्याने परिसरात भीती व्यक्त होत होती.

दरम्यान दुपारी  कुरळप येलूर सीमेवर असणाऱ्या पेठकर मळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसात भांगलण सुरू होती. त्यावेळी पाणी प्यायला शेतातून बाहेर आलेल्या तीन महिलांनी बिबट्याला पाहिले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने शेजारच्या उसात झेप घेतली.. भयभीत झालेल्या महिलांनी तात्काळ शेतातून बाहेर येऊन घरचा रस्ता धरला..

दरम्यान सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक सुरेश चरापले.अमोल साठे रहना पाटोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ठशांची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

  •  सांगलीतील वाळव्यात शेतात बिबट्याचे दर्शन
  • महिलांनी त्याला पाहताच केला आरडा ओरडा
  •  बिबट्याची पुन्हा उसाच्या शेतात झेप
  •  नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
  •  बिबट्याचे ठसे उमटल्याचे फोटो व्हायरल

Leopard sightings in a dry field in Sangli; An atmosphere of fear among the citizens

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण