हिंदूत्वाची कास सोडून उध्दव ठाकरे खुर्चीला चिकटलेले, नारायण राणे यांचा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले आहेत. ते फांदीवर बसलेले पक्षी असून त्यांचे झाड लवकरच कोसळेल असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.Leaving Hindutva behind, Uddhav Thackeray clinging to his chair, Narayan Rane’s attack

एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडे नव्हते ते उद्धव ठाकरेंचे आहे. त्यांची बाळासाहेबांशी तुलना होऊ शकत नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी आयुष्यात केली नाही. आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले आहेत. मी आज बोलतोय उद्या महाविकास आघाडी केसेस टाकतील आम्हीही केस टाकू शकतो पण आम्ही रडीचा डाव खेळत नाही.उद्या दंगली भडकल्या तर त्या आवरण्याचे कसब राज्य सरकारकडे नाही. राज्य सरकारातील गृहमंत्री माझे आधी मित्र होते आता ते मित्र नाही. ते चांगले नेते आहे पण गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले पद सांभाळले नाही. राज्यात अत्याचार करणाºया अधिकाऱ्यांना अभय मिळाले.

राणे म्हणाले, माझा भोंग्याला विरोध नाही पण बेकायदेशिर भोंग्याला विरोध आहे. भोंग्याबद्दल कारवाई करायला राज्य सरकारमध्ये ताकद नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा अन्य कुठलाही प्रश्न सोडवण्याची ताकद नाही. राज्याला मुख्यमंत्रीच नाही. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो,

माझ्यानंतर अडीच तासात राज्य कारभार ढेपाळला. उद्धव ठाकरेंना वर्षा ते मंत्रालय जायला जमत नाही असे हे मुख्यमंत्री आहेत. या पदासाठी तीन पक्षाचे सरकार असूनही लायकीचा माणूस नाही. राज्य सुरक्षित नाही, उद्योजक येत नाही. उद्योग ठप्प आहे अशी राज्याची दयनिय स्थिती आहे पण मुख्यमंत्री बोलत नाही, विकासासाठी ते पैसे नाही कुठुन आणणार ?

Leaving Hindutva behind, Uddhav Thackeray clinging to his chair, Narayan Rane’s attack

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती