रत्नागिरीतील जमीनप्रकरणी अनिल परब यांची चौकशी करण्याचे पर्यावरण मंत्रालयाचे आदेश


वृत्तसंस्था

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारी बेकायदा जमिन खरेदी करून रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीचे आदेश केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जारी केले आहेत. land case in Ratnagiri Ministry of Environment orders inquiry Of State Minister Anil Parab

रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड येथे अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधण्यासाठी सुमारे 4 हजार चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. परंतु, समुद्र किनारपट्टीचे नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबतची तक्रार भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट आणि मनोज कोटक यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्रालयाने परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनिल परब यांना 4 हजार 250 चौरस मीटरची शेतीची जागा विकली होती. तेव्हा कोणतेही बांधकाम अथवा रस्ता तेथे नव्हता. पण ,परब यांनी जागा बिगरशेती करून घेण्यासाठी माझ्याकडून संमतीपत्र घेतले तसेच जमिनीचे कायदेशीर मालक स्वतः असल्याचे सांगितले होते, अशी माहिती जमिनीचे मालक विभास साठे यांनी दिली.अनिल परब यांनी ही जागा कोस्टल झोनमध्ये कशी करून घेतली, याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीने दिले आहेत. त्यासाठी चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटची मदत घेण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. दुसरीकडे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत, अशी महिती महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीचे संचालक नरेंद्र टोके यांनी दिली.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटचे शास्त्रज्ञ दीपक सॅम्युअल म्हणाले, आम्हाला इ मेलवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संचालक देतील. कोरोनामुळे त्यांच्या पथकाला घटनास्थळी भेट देतात आली नाही, अशी माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांनी दिली.

तक्रारदार प्रसाद कर्वे म्हणाले, राज्य वन विभागाने कोल्हापूर येथील वन प्रमुखांना याबाबत चौकशी करण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी ती केली नाही.
दापोलीतील अधिकारी वैभव बोराटे म्हणाले, सीसीएफ कार्यालयाने कोणताही संपर्क साधला नसला तरी आमचे कर्मचारी चौकशी करून अहवाल देतील.

land case in Ratnagiri Ministry of Environment orders inquiry Of State Minister Anil Parab

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था