Amravati MP Navneet Rana : महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर होता. कोर्टाने नवनीत राणा यांनाही दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. amravati mp navneet rana caste certificate cancelled by Nagpur Bench Of bombay high court
विशेष प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर होता. कोर्टाने नवनीत राणा यांनाही दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. नवनीत राणा मूळच्या पंजाबमधील असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्त्याने म्हटले की, त्या महाराष्ट्रातील एससी प्रवर्गात न येणाऱ्या लबाना जातीच्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी बनावट पद्धतीने त्यांचे जात प्रमाणपत्र बनविले, नवनीत राणा यांच्यावर शाळेची बनावट कागदपत्रे दाखवून प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप होता.
संसदेच्या अधिवेशनात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कायम चर्चेत असतात. गेल्या संसद अधिवेशनात जेव्हा महाराष्ट्रात घडलेल्या अँटिलिया प्रकरणाबाबत वाद झाला होता, तेव्हा नवनीत राणा यांनी केंद्र सरकारची बाजू घेत राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
नवनीत राणा यांनी नंतर शिवसेना नेत्यांकडून आपल्याला धमक्या दिल्या असल्याचा आरोपही केला होता. नवनीत राणा यांनी लोकसभा सभापती, गृहमंत्री आणि पंतप्रधानांसमोर हा विषय उपस्थित केला.
नवनीत राणा यांनी 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता, त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला. परंतु, 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि जिंकलीसुद्धा. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत.
amravati mp navneet rana caste certificate cancelled by Nagpur Bench Of bombay high court
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App