आता अनिल परबही अडचणीत, लॉकडाऊनमध्ये शेतजमीनीवर उभारला रिसॉर्ट, कारवाई करण्याची भाजपाची राज्यपालांकडे मागणी


लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना गरजेच्या वस्तू मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चक्क समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट उभा केला. अनधिकृतपणे उभारलेल्या या रिसॉर्टवर कारवाई करावी, सीआरझेडचा भंग, वन व पर्यावरणाचे नुकसान, सरकारी दस्तऐवजात खाडाखोड व मंत्रीपदाचा दुरुपयोग याबाबत कारवाई करण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे.Now Anil Parab is in trouble, resort built on agricultural land in lockdown, BJP demands governor to take action


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना गरजेच्या वस्तू मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चक्क समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट उभा केला.

अनधिकृतपणे उभारलेल्या या रिसॉर्टवर कारवाई करावी, सीआरझेडचा भंग, वन व पर्यावरणाचे नुकसान, सरकारी दस्तऐवजात खाडाखोड व मंत्रीपदाचा दुरुपयोग याबाबत कारवाई करण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. हा रिसॉर्ट शेतजमिनीवर अनधिकृतपणे बांधलेला आहे.

याबाबत भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

त्यामुळे सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली आहे. अनिल परब यांच्यावर मंत्रीपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाउनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा,

अशी मागणी सोमय्या यांनी केली होती.भाजपाचय शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेऊन परब यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.

याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागविण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले, अशी माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना दिली. शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राम कदम, आमदार मिहिर कोटेचा, आमदार राहुल नार्वेकर आदींचा समावेश होता.

Now Anil Parab is in trouble, resort built on agricultural land in lockdown, BJP demands governor to take action

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती