नोकरीची बातमी : महाराष्ट्रात विविध खात्यांमध्ये 2,75000 जागांसाठी लवकरच नोकरभरती!!


प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने मेगाभरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात लवकरच २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे. राज्यात ४२ विभागात तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त असल्याची माहिती आहे.Job News: Recruitment for 2,75000 posts in various departments in Maharashtra soon



किती जागा रिक्त?

  •  गृहविभाग- ४९ हजार ८५१
  •  सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
  •  जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
  • महसूल आणि वन विभाग : १३ हजार ५५७
  •  वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
  •  सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
  • आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
  • सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

या जागांवर लवकरच भरती निघणार आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मागील पाच-सहा वर्षांत रिक्त जागांची भरती होऊ शकली नाही. सध्या सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त झाल्या आहेत.

रिक्त जागा वाढण्याची कारणे

दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.

Job News: Recruitment for 2,75000 posts in various departments in Maharashtra soon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात