जितेंद्र आव्हाड यांची श्री श्री रविशंकर यांच्यावर सोशल मीडियातून शेरेबाजी


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारमधले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर सोशल मीडियातून विशिष्ट शब्दांमध्ये शेरेबाजी केली आहे. ऑस्ट्रेलिया, लंडन, अंडमान अशा शब्दांची वेगवेगळ्या प्रकारे खेळ खेळत जितेंद्र आव्हाड यांनी श्री श्री रविशंकर यांच्यावर अश्लील शब्दांमध्ये टीका केली आहे. या संदर्भातले त्यांचे ट्विट सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध क्षेत्रांमधून टीकाटिपण्या होत आहेत.Jitendra Awhad slanders Sri Sri Ravi Shankar on social media

श्री श्री रविशंकर यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी सध्याच्या ऑस्ट्रेलियाला महाभारत काळात अस्त्रालय असे म्हटले जात होते, असे म्हटले आहे. तेथे मोठी अस्त्रे ठेवली असावीत कारण ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी प्रचंड मोठे वाळवंट आहे.



तेथे मोठा अणूस्फोट झाला असावा, असे वैज्ञानिक मानतात, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका केव्हाच आहे याबद्दल कोणालाही सांगता आलेले नाही. यावरून सोशल मीडियाच्या रविशंकर यांच्यावर अनेक बाजूंनी टीका टिप्पण्या झाल्या आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी अश्‍लील शब्दांमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या वर टीका केल्याचे दिसून येत आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1456625198669631489?s=20

ट्रीपल श्री म्हणजेच श्री श्री श्री रविशंकर च्या म्हणण्यानुसार अस्त्रे ठेवत होते म्हणुन त्या जागेचे नाव अस्त्रालय-आस्ट्रेलिया असे पडले…! या नुसार नकाशात लंडन आणि अंडमान जवळ जवळ पाहिजेत…!! जास्त स्पष्ट लिहायचे तर अंडमान लंडन च्या खाली पाहिजे…!!!

Jitendra Awhad slanders Sri Sri Ravi Shankar on social media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात