मालेगाव बॉम्बस्फोटात आपला जबाब नोंदिवलाच नाही, कोर्टात सादर केलेला जबाब आपला नाहीच, साक्षीदाराने भर कोर्टात सांगितले


प्रतिनिधी

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपला कधी कोणी जबाब नोंदवला नाही जो जबाब कोर्टात सादर केलाय तो जबाब माझा नाही. मी कोणत्याही आरोपीला ओळखत नाही असं देखील या साक्षीदाराने भर कोर्टात सांगितले.In the Malegaon bomb blast, your answer was not recorded, the answer presented in the court was not yours, the witness told the court.

मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा व त्यासाठी स्फोटकं उपलब्ध करून दिल्याचा आरोप कर्नल प्रसात पुरोहित यांच्यावर आहे. पण, साक्षीदाराने कर्नल प्रसाद पुरोहित यांना न ओळखल्याचे सांगितले आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या 2008 मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्यातील 18 वा साक्षीदार देखील पलटला आहे.



राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य पाच जणांवर आरोप निश्चित केले होते. सातही आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला आहे, असं या आरोपपत्रात नमुद करण्यात आले होते.

साध्वी प्रज्ञा आणि पुरोहितसह समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुवेर्दी या सात आरोपींवर यूएपीए आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. पण या सातही आरोपींनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहे.

29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणी तपास करत असताना महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह तिच्या दोन साथीदार यांना अटक केली होती. त्यानंतर 20 जानेवारी 2009 मध्ये एनआयएने आपला तपास पूर्ण करुन या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. काही महिन्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला.

अहवालानुसार 26 जानेवारी 2008 मध्ये अभिनव भारत या संघटनेने बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला पुरोहित उपस्थित होते. तर यावर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपली बाजू मांडत आपण लष्कराच्या कामासाठी माहिती मिळवत होतो.

त्यासाठीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला उपस्थित राहिलो ते आपल्या कर्तव्याचाच एक भाग होता. त्यामुळे एनआयएने आपल्यावर कारवाई करण्यापूर्वी मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे पुरोहित यांनी म्हटले होते.

In the Malegaon bomb blast, your answer was not recorded, the answer presented in the court was not yours, the witness told the court.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात