शिवसेनेच्या मूकसंमतीने अखेर मालेगावातील उर्दू घराला “हिजाब गर्ल” मुस्कान खानचे नाव!!


प्रतिनिधी

मालेगाव : मालेगावमधील उर्दू घर इमारतीला बहूचर्चित “हिजाब गर्ल” मुस्कान खान हिचे नाव देण्याची मागणी होऊ लागली, तेव्हापासून या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यावर टीकादेखील होऊ लागली होती. मात्र अखेरीस राज्य सरकारच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या उर्दू घर इमारतीला मुस्कानचे नाव देण्याचा ठराव मालेगाव महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या संभेत मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेने विरोध न करता मूकसंमती दर्शवली.With the tacit consent of Shiv Sena, the Urdu house in Malegaon was finally named “Hijab Girl” Muskan Khan.

या ठरावाला भाजप आणि जनता दलाच्या सदस्यांनी जोरदार विरोध करत ऑनलाईन सभेत गोंधळ घातला. तर शिवसेनेने ठरावाच्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अखेर बहुमताच्या जोरावर महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. मुस्कान खान हिच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शहरात आठ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत उर्दू घराला तिचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तेढ निर्माण करणारी नावे सरकारी इमारतींना देऊ नये, असे सरकारचे आदेश असतानाही “हिजाब गर्ल”चे नाव उर्दू घराला देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा शेख म्हणाल्या की, भारत हा गंगा जमुना संस्कृतीचा देश आहे. या देशात सर्वधर्मीयांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याला गालबोट लावण्याच प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकात हिजाब बंदीविरोधात हजारो महिला रस्त्यावर उतरुन लढा दिला जात आहे. त्यांना धैर्य देण्याचे काम मुस्कानने केले आहे. तिच्या धाडसाचे कौतुक आणि इतर महिलांना हिंमत देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे ताहेरा शेख यांनी म्हटले.

कोण आहे हिजाब गर्ल मुस्कान खान?

कर्नाटकातील उडुपी इथे एका कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या एका विद्यार्थिनीला जमावाने घेरत जय श्रीरामचे नारे दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मुलीनेही दोन्ही हात उंचावून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या होत्या. या मुलीचे नाव मुस्कान खान. मुस्कानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

With the tacit consent of Shiv Sena, the Urdu house in Malegaon was finally named “Hijab Girl” Muskan Khan.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण