ओडिशात बिजू जनता दलातून निलंबित आमदाराने भाजपच्या 22 कार्यकर्त्यांना चिरडले; संतप्त जमावाने चोपले!!


वृत्तसंस्था

चिल्का : ओडिशा राज्यातील चिल्का येथील बिजू जनता दलचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने भाजपच्या २२ कार्यकर्त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला, त्यामध्ये ७ पोलिसांचा समावेश आहे. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेनंतर संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली. यामध्ये आमदारही जखमी झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. In Odisha, a suspended MLA from Biju Janata Dal crushed 22 BJP workers

खुरदा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे काही समर्थक कार्यालयाच्या बाहेर जमले होते. यावेळी चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनाने जमलेल्या लोकांना चिरडले. त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. सध्या जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती एसपी आलेखचंद्र पाधी यांनी दिली.

आमदार जगदेवांना अटक करण्याची मागणी

दरम्यान, प्रशांत जगदेव यांची बिजू जनता दलातून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचबरोबर जगदेव यांना जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनदेखील हटवण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर ओडिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे.

In Odisha, a suspended MLA from Biju Janata Dal crushed 22 BJP workers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात