बारामतीतील गावात दोन गट खासदार सुप्रिया सुळेंसमोर एकमेकांना भिडले; रस्ता रुंदीकरणावरून वाद


प्रतिनिधी

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा हाय प्रोफाईल दौरा चर्चेत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात एका गावातील दोन गटांमधल्या संघर्ष उफाळून बाहेर आला आहे. In a village in Baramati, two groups clashed in front of MP Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती तालुक्यात काही गावांना भेटी दिल्या. यावेळी डोर्लेवाडी गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. पण यावेळी गावातले दोन गट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच एकमेकांना भिडले.

जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो, गावठाणात रस्ता रुंदीकरण 10 मीटर व्हावे की 7 मीटर यावरून गावकऱ्यांमध्ये वाद आहे. याच मुद्यावरून दोन गट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद घातला. शेवटी सुप्रिया सुळे यांना मध्यस्थी करून
दोन्ही गटाची समजूत काढावी लागली.


सुप्रिया सुळे : तुळजापुरातलं नवसाचं मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच ताटातलं वाटीत आलं!!


सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. सुळे यांनी आश्वासन दिले. आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.

 डोर्लेवाडीतील रस्ता रुंदीकरणाचा वाद

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. येथे 10 मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत एक गट म्हणाला, की रस्ता 7 मीटर रूंद करावा, तर दुसऱ्या गटाने 10 मीटर रस्तारुंदीचा आग्रह धरला. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले. सुप्रिया सुळे आज गाव भेटीवर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली आणि पाहता पाहता अनेक जण उठून वेगवेगळ्या भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळ आणि वाद झाले. हा गोंधळ आणि वाचणारे अर्धा तास चालला.

शेवटी सुप्रिया सुळे यांना मध्यस्थी दोन्ही बाजूंना सावरावे लागले. त्यांनी नेमका वाद समजून घेतला आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला.

पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीगाठी देवस्थानांची दर्शने यामुळे गाजला, तर सुप्रिया सुळे त्यानंतर बारामतीत आल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात दोन गटांमधला वाद त्यांच्यासमोर घडला. त्यामुळे हाय प्रोफाईल बारामती मतदारसंघ मात्र दोन्ही बाजूंनी चर्चेत आला आहे.

In a village in Baramati, two groups clashed in front of MP Supriya Sule

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय