HSC Exam 2022 कोरोना नियमावली आजपासून 12 वी ची ऑफलाईन परीक्षा सुरू; बोर्डाकडून नियमावली जारी


प्रतिनिधी

पुणे : कोरोना नियमावलीसह आजपासून 12 वीच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू झाली आहे. शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर मुलांचे स्वागत केले आहे. गेल्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच होत ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहे. HSC Exam 2022 Corona Rules 12th Offline Exam Starts From Today; Rules issued by the Board



 हे नियम असे :

  •  कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, राज्य बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
  •  विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.
  •  परीक्षेला राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 9 हजार 635 ठिकाणी होणार आहे.
  •  परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 2 तर दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत होणार आहे.

HSC Exam 2022 Corona Rules 12th Offline Exam Starts From Today; Rules issued by the Board

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात