पूरस्थिती उद्भवलेल्या भागात पाहणी दौऱ्यांपेक्षा मदतकार्य करा – राज ठाकरे


विशेष प्रतिनिधी

ठाणे – ‘पूरस्थिती उद्भवलेल्या भागात केवळ पाहणी दौरे महत्त्वाचे नाहीत. आपद्ग्रतस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदतकार्य पोहोचवणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीही राज्यात अशा घटना घडल्या आहेत; मात्र कोणत्याच सरकारला शहरांच्या नियोजनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही,’’ अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी येथे केली.Help peoples in flood hit area instead of only visits

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली गाढली गेली.



पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांनी पाहणी दौरे केले. या दौऱ्यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या घटना घडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी पाहणी केली.

मीही मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर माझा मनसैनिक कानाकोपऱ्यात जाऊन पोचला. पाहणी करणे वाईट नाही; मात्र केवळ पाहणी दौरे करण्यापेक्षा मदतकार्य करणे महत्त्वाचे असल्याचे राज यांनी सांगितले.

Help peoples in flood hit area instead of only visits

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात