आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Education Minister Varsha Gaikwad Teacher Recruitment throuth PAVITRA Portal

Education Minister Varsha Gaikwad : अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षणसेवकांची भरती करण्यास राज्यशासनाने अखेर हिरवा कंदिल दिला आहे. राज्यातील 6100 शिक्षणसेवकांची पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA) पोर्टलमधून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12,070 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5,970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाली आहे. Education Minister Varsha Gaikwad Teacher Recruitment through PAVITRA Portal


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षणसेवकांची भरती करण्यास राज्यशासनाने अखेर हिरवा कंदिल दिला आहे. राज्यातील 6100 शिक्षणसेवकांची पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA) पोर्टलमधून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12,070 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5,970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना, सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्याआधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित होती. मात्र, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकाराने पदभरतीला बंदीतून वगळण्यात आले आहे.

Education Minister Varsha Gaikwad Teacher Recruitment through PAVITRA Portal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात