राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात समाधानकारक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

Monsoon forcast in Maharashtra next 4 to 5 days light to heavy rains in state

Monsoon forecast : मान्सूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात समाधान पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Monsoon forecast in Maharashtra next 4 to 5 days light to heavy rains in state 


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मान्सूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात समाधान पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नेहमीप्रमाणे जूनमध्ये पावसाने राज्यात आगमन केले. सुरुवातीला दमदार झालेल्या पावसाने नंतर दडी मारली होती. ऐन पावसाळ्यात उन्हाची काहिली पुन्हा अनुभवावी लागली. परंतु आता दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून मध्यम ते मुसळधार पाऊस होत आहे.

हवामान अनुकूल झाल्यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे अवघ्या महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह दमदार पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

Monsoon forecast in Maharashtra next 4 to 5 days light to heavy rains in state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण