गब्बर चित्रपटातील स्टोरी इस्लामपूरमध्ये प्रत्यक्षात घडली, पैशासाठी मृत रुग्णाला जीवंत दाखवून डॉक्टर करत होता उपचार


विशेष प्रतिनिधी

सांगली : गब्बर या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार वैद्यकीय व्यवसायातील रॅकेट उघड करण्यासाठी मृत व्यक्ती रुग्ण म्हणून घेऊन येतो. मृतावर दोन दिवस रुग्णालयात उपचारही होता आणि लाखो रुपये बिल केले जाते. Gabbar movie actually happened in Islampur, the doctor was treating the dead patient alive for money

अगदी अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे गडली आहे. मृत रुग्णाला जिवंत असल्याचे दाखवून एका डॉक्टरने दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.



डॉ. योगेश रंगराव वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये गेल्या दीड वर्षांपासून करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

२४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा (वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल केलं होतं. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने त्यांच्यावर उपचार सुरू केले. रुग्ण सायरा यांचा उपचारादरम्यान ८ मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला.

ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरूच ठेवले. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केले. याप्रकरणी डॉ. वाठारकर याच्यावर आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी इस्लामपूर अटक करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकारावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे.

राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मूळापासून मिटवता येईल, एव्हढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत.

Gabbar movie actually happened in Islampur, the doctor was treating the dead patient alive for money

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात