TET Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात ईडीची एंट्री!!; करणार मनी लॉंड्रिंगचा तपास!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील टीईटी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली आहे. ED’s Entry In TET Exam Scam!!; Will investigate money laundering

या प्रकरणी सिल्लोडचे आमदार, माजी महसूल  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने खळबळ उडाली असून आता या प्रकरणी ईडीने मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सत्तांरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सत्तारांचे संभाव्य मंत्रिपद अडचणीत आले आहे.



टीईटी परीक्षा घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. याबाबत अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. असे असले तरी यासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी करणार आले. या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझ्याकडे रविवारी दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिले की कोणीतरी खोटी बातमी चालवत असून, कोणीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अपात्र असूनही नोकरी मिळवलेल्या 7880 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. हिना अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार या मुलींची नावे या यादीमध्ये आहेत.

2019 साली झालेल्या शिक्षक पात्र परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे काही धागेदोरे पुणे पोलिसांना मिळाले होते. परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावे पैसे घेऊन पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसह इतरांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्या उमेदवारांना पैसे घेऊन पास करण्यात आले, अशांची देखील यादी तयार केली. तब्बल 7800 जणांची ही यादी आहे. दरम्यान, या यादीत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आहेत. राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत 102 आणि 104 क्रमांकावर अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आहेत.

ED’s Entry In TET Exam Scam!!; Will investigate money laundering

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात