ठाकरे – पवारांचे मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात एकेक वाझे; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची परिस्थिती अशी झालीय की मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Devendra fadanavis hits out at Thackeray – pawar govt



मुंबई येथे आयोजित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोप सत्राला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमूख मुद्दे असे –

  •  महाराष्ट्राची आजची परिस्थिती जी आहे, त्याला सरकार म्हणता येईल का? मंत्री झाले एकेक विभागाचे राजे अन् प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी अवस्था.
  •  कोविडमध्ये उत्तम काम केले अशी पाठ थोपटली जाते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का?
  •  सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात… हे तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल.
  •  मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे महाराष्ट्रात आहे का? असा प्रश्न निर्माण करणारे यांचे काम आहे!
  •  एकतरी जंबो कोविड सेंटर मुंबईच्या बाहेर उघडले का?
  •  विविध विभागांमधील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे घेत आहेत.
  •  केवळ आणि केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले.
  •  केंद्राकडे डेटाची मागणी ही ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकविण्यासाठी. पण महाविकास आघाडी सरकारला ५० टक्क्याच्या खालचे आरक्षण टिकविता आले नाही.
  •  १५ महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिले. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आतले सुद्धा ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज.
  •  या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा. केवळ इच्छाशक्ती असावी लागते. भाजपा २६ तारखेचे आंदोलन करून शांत बसणार नाही. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर शांत बसणार नाही. त्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ.
  •  पुढची कारवाई न करता आताच केंद्र सरकारकडे जाणे म्हणजे मुलगा झालेला नसताना त्याचे नाव ठेवण्यासारखे आहे.
  •  फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करणे, हे एकमेव काम आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त खोटे बोलणे, या सरकारचे एवढे एकच काम.
  •  या सरकारने विधिमंडळ बंद केले. लोकशाहीची दारं बंद करून टाकली असतील, पण लोकशाही पुनर्स्थापित कशी करायची हे आम्हाला ठावूक आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात