उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बूस्टर डोससंबंधी मांडली भूमिका ; केंद्राला पुढाकार घेण्याचं केलं आवाहन


काल पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे ७ रुग्ण आढळून आले आहेत. Deputy Chief Minister Ajit Pawar’s presentation on booster dose; He appealed to the Center to take initiative


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा शिरकाव देशात झाल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केल्याने राज्याची चिंता वाढवली आहे.तसेच काल पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे ७ रुग्ण आढळून आले आहेत.यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी बूस्टर डोसबाबत यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच केंद्राला पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सुद्धा बाधा झाल्याचं दिसत आहे. मग आता यावर प्रश्न निर्माण होतोय की, बूस्टर डोसची गरज आहे का?



पुढे अजित पवार म्हणाले की, आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. बुस्टर डोससंबंधी वेगवेगळा मतप्रवाह असलेला दिसून येत आहे.मग तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ व्यक्तीच सांगू शकतात’, अस मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Deputy Chief Minister Ajit Pawar’s presentation on booster dose; He appealed to the Center to take initiative

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात