एसटी कर्मचारी संप ,विलीनीकरणाबाबत काय म्हणाले अजित पवार


सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.What did Ajit Pawar say about ST workers’ strike and merger?


विशेष प्रतिनिधी

पुणे : मागील दोन तीन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं शासनात विलीनीकरण करावं.परंतु सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की , विलीनीकरणाचं प्रकरण उच्च न्यायालयात आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे.त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.

What did Ajit Pawar say about ST workers’ strike and merger?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती