काँग्रेस खासदार रजनी पाटील यांची केंद्र आणि योगी सरकारवर टीका , म्हणाल्या – “तालिबानी सरकार आणि उत्तर प्रदेमधील सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”


काॅंग्रसेच्या खासदार रजनी पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केंद्र सरकार आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे.Congress MP Rajni Patil criticized the Center and the Yogi government, saying – “The only difference between the Taliban government and the government in Uttar Pradesh is the beard.”


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लखीमपूर खिरीमधील वातावरण चांगलच तापले आहे.

अशातच आता काॅंग्रसेच्या खासदार रजनी पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केंद्र सरकार आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी पाटील म्हणाल्या की ‘”अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक आहे. दोन्ही सरकार समान अत्याचार करत आहे.”पुढे रजनी पाटील म्हणाल्या की , योगी सरकारच्या काळात खूप अत्याचार होत आहेत.याचच उदाहरण लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलनही चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रियंका गांधी यांनीही अटक करण्यात आली आहे.योगी सरकारच्या काळात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध काॅंग्रसेमधीसमधील महिला आवाज उठल्याशिवाय राहणार नाही.असही त्या म्हणाल्या.

दरम्यान यावेळी , मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत रजनी पाटील म्हणाल्या की , ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ अशी घोषणा भाजप नेहमी देते. परंतु या घोषणांची अंमलबजावणी भाजपकडून होतच नाही. भाजपला अशा घोषणा देताना लाज बरी वाटतं नाही.अस देशील रजनी पाटील म्हणाल्या.

Congress MP Rajni Patil criticized the Center and the Yogi government, saying – “The only difference between the Taliban government and the government in Uttar Pradesh is the beard.”

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण