राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपने रजनी पाटलांच्या विरोधात उतरवले संजय उपाध्याय; महाविकास आघाडीतल्या भेदाला खतपाणी


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने रजनी पाटील यांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू असताना भाजपने मात्र संजय उपाध्याय यांच्या रूपाने उमेदवार उतरवून या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. किंबहुना आघाडीत भेद करण्याची नीती अवलंबली आहे.BJP fielded Sanjay Upadhyay against Rajni Patil in Rajya Sabha by-election; Fertilizing the differences in the Mahavikas front

संजय उपाध्याय यांनी आज या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व अन्य नेते यावेळी उपस्थित होते. संजय उपाध्यायांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना चंद्रकांतदादा यांनी काँग्रेसचा उमेदवार रजनी पाटील यांच्या अर्जावरच्या हरकती बद्दल वेगळे विधान केले. ते म्हणाले की योग्य वेळी त्यांच्या काही बाबी बाहेर येतील.



त्याच वेळी चंद्रकांतदादांनी आघाडीतील मतभेदांचाही विशेषत्वाने उल्लेख केला. ते म्हणाले, की 56 आमदारांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो. 54 आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, तर आमच्याकडे 105 आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येण्यात काय अडचण आहे? राजकारणात काहीही घडू शकते, असा इशारा देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे.

रजनी पाटलांना दगाफटका होण्याची भीती कुणाकडून…??

रजनी पाटील यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तणाव आहे. रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही स्थान दिले होते. परंतु, त्यांचे नाव नंतर वगळून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. यातून काँग्रेसच्या उमेदवाराला काही राजकीय दगाफटका होण्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

त्यामुळेच काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु तरी देखील संजय उपाध्याय यांच्या रूपाने भाजपने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणखी भेद तयार करून ते उघड्यावर आणण्याचा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

BJP fielded Sanjay Upadhyay against Rajni Patil in Rajya Sabha by-election; Fertilizing the differences in the Mahavikas front

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात