विशेष प्रतिनिधी
मुंबई : इतर मागासवर्गीय समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तत्काळ कार्यवाही करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. CM Thackeray said that OBC will get the full scholarships, bogus certificates also to be inquired
तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली आहे की, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कुठलीही कपात केली जाणार नाही, तसेच ओबीसींचे बोगस दाखले देण्यात येत असल्याची चौकशी केली जाईल.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक घेतली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बहुजन कल्याण मंत्रीविजय वडेट्टीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे इत्यादी उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासाठी आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने निधी देण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात त्वरित कारवाई करायला सांगितली :
1) महाज्योती संस्थेची उपकेंद्रे राज्यातील विभागीय ठिकाणी सुरू करणे.
2) महाज्योतीला स्वतंत्र व्यवस्थापकीय संचालक व कर्मचारी, अधिकारी नेमणे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना :
तांडा वस्ती सुधार समिती.
शिष्टमंडळात चंद्रकांत बावस्कर, ज्ञानेश्वर गोरे, जे. डी. तांडेल, लक्ष्मण गायकवाड, हरिभाऊ शेळके, गणेश हाके, ॲड. पल्लवी रेणके इत्यादींचा समावेश होता.या शिष्टमंडळाने राज्याची तामिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जणगणना करावी अशी मागणी केली आहे.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी विद्यार्थांसाठी 72 वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून लवकरच ती सुरू होतील. भटक्या आणि विमुक्त जातीचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे, तसेच 31ऑगस्टला विमुक्त दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी लक्ष्मण गायकवाड यांनी केली. या मागणीवर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App