मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीही काढला कृषी कायद्यांचा मुद्दा; आपल्या मंत्र्यांविरोधातील आक्रमक भाजपवर प्रतिहल्ल्याची तयारी


प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांवर आलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आधी उपस्थित केलेल्या मुद्द्यालाच दुजोरा दिला. अर्थात या दोन्ही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होते. CM uddhav thackeray tunes against farm laws

उध्दव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची हमी देतानाच केंद्र सरकारवर कृषी कायद्यांबाबत निशाणा साधला. ते म्हणाले, की केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. त्यांना कोणतेही कायदे करू द्या, मात्र शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

हमीभाव नव्हे, तर हमखास भाव

राज्यातील शेतकरी कायमचा चिंतामुक्त व्हायला हवा आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये, असे सांगतानाच ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्या दिवशी राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल. राज्यातील शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे, याची आठवण उध्दव ठाकरे यांनी करवून दिली.

शिवसेनेने कृषी कायद्यांना लोकसभेत पाठिंबा दिला होता

आज जरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कृषी कायद्यांच्या विरोधात सूर काढत असले, तरी केंद्रात सत्ताधारी एनडीए बरोबर असताना शिवसेनेच्या १८ खासदारांनी तीनही कृषी कायद्यांच्या बाजूने मतदान केले होते.

आता महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी – काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी करून सरकार चालवले असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कृषी कायद्यांच्या विरोधात सूर काढताना दिसत आहेत. ठाकरे – पवार सरकारमधल्या मंत्र्यांवर भाजप आक्रमक हल्ले चढवत असताना त्यांनी प्रतिहल्ल्याचे हत्यार म्हणून कृषी कायद्यांचा विषय काढल्याचे मानण्यास वाव आहे.

CM uddhav thackeray tunes against farm laws

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात