वृत्तसंस्था
पुणे: चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहे एक डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Cinemas in Pune from 1st December Will open; Condition to follow the rules
पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे १डिसेंबरपासून जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मागील काही दिवसांपासून ५० टक्के क्षमतेने सुरू असणारे शहरातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेंरिएंटसाठी सज्ज असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटलबाबत ३१ डिसेंबर रोजी परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App