राज्यात कोरोनाची स्थिती बदलतीय, रुग्णांसह मृत्यूतही थोडी वाढ


विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात मृत्यूचा आकडा काहीसा वाढला असून आज १५८ रुग्ण दगावले. बुधवारी ११६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दिलासादायक म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी अकोला, नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.Changing situation in maharashtra

पुणे मंडळात सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे ४७ मृत्यूची नोंद झाली. ठाणे ३८, नाशिक ३४, कोल्हापूर ३२, लातूर ७ मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्युदर २.११ टक्के इतका आहे; तर मृतांचा एकूण आकडा १,३५,४१३ वर पोहोचला आहे.



राज्यात आज दिवसभरात ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन ५८,०६९ इतकी झाली. आज दिवसभरात ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६२,०९,३६४ इतकी आहे.

Changing situation in maharashtra

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात