दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे अशी काहींची समजूत असते. ती अर्थातच चुकीची आहे. असे लोक दुसऱ्याच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करीत असतात. आपल्या कानावर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी पडत असतात, सतत कोणते ना कोणते आवाज, शब्द पडत असतात. Listening to others does not mean underestimating yourself
ते शब्द आपण ऐकतही असतो. मात्र त्याला खऱ्या अर्थाने लक्षपूर्वक ऐकणे असे म्हटले जात नाही. ऐकणे व लक्षपूर्वक ऐकणे यात एक महत्वाचा फरक आहे. तो प्रत्येकाने समजून उमजून घेतला पाहिजे. ज्यांना जीवनात यश मिळावे असे वाटते त्यांनी हा फरक नेमकेपणाने ओळखला पाहिजे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे.
कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. दुसऱ्यानचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे हा सौजन्याचाच एक भाग आहे. यशासाठी दुसर्याेच्या बोलण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. दुसर्याशी महत्वाचे संभाषण करताना आपला मोबाईल फोन वाजणार नाही याची दक्षता घ्यावी. भरकटणारे मन हे लक्षपूर्वक ऐकण्यात मोठाच अडथळा निर्माण करते. त्याला प्रयत्नपूर्वक वेसण घालावी लागते.
शारीरिक भाषेवरून व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत आहे की नाही हे समजून येते. डोळ्याला डोळा भिडवून ऐकणारा तुमच्या बोलण्यात रस घेत असतो, तर तुम्ही बोलत असताना इकडे तिकडे बघत क्वचित जांभई देत, पेन किंवा तत्सम वस्तूशी चाळे करत ऐकणारा बळेबळेच तुमचे बोलणे ऐकत आहेअसे समजावे. माणसाचा दृष्टीकोन त्याच्या अशा हालचालीवरून लक्षात येतो.
सकारात्मक दृष्टीकोनातून दुसर्या चे बोलणे ऐकल्यास आपोआपच ते शारीरिक हालचालींमध्येही उमटते. मुद्दाम मग शारीरिक भाषेकडे लक्ष देण्याची गरजही भासणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App