पंजाबमधील बदल कॉंग्रेसला धक्का देणारा; शरद पवार यांची प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाही. मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. Change in Punjab shocks Congress Sharad Pawar’s reaction

पंजाब असे राज्य होते ज्याठिकाणी कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे.’आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पध्दतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ ला झाला असं स्वच्छ दिसते असेही पवार यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले आहे. लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा,असेही पवार यांनी सांगितले.

Change in Punjab shocks Congress Sharad Pawar’s reaction

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात