UP ELECTION RESULT LIVE :भगवाधारी ..शेतकरी आंदोलन, महागाई-बेरोजगारी सर्वांवर भारी ! ना प्रियंका गांधींचे ‘नाक’ ना मायावतींची ‘जात’ सगळेच सुपर फ्लॉप…फक्त मोदी- योगिराज…


काँग्रेसने अनेक दशकांपासून जपून ठेवलेले ट्रम्प कार्ड फोल ठरले ; प्रियांका पदार्पणातच सुपर फ्लॉप ठरल्या

अखिलेश यादव फक्त गर्दी जमवत राहिले मतदान मात्र योगिंनाच मिळाले .

मायावतींचा थंड प्रचारही याला कारणीभूत ठरला …त्यांचं जतीच समीकरणही जनतेने धुडकावून लावलं.


माधवी अग्रवाल

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील निवडणुकीकडे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते आणि त्यातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक उत्तर प्रदेशाची (Ut) होती.शेतकरी आंदोलनाचा प्रभाव भाजपच्या कायदा आणि सुव्यवस्था, तसेच विकासाचा मुद्दा या समोर फेल ठरला .भगवाधारी ..शेतकरी आंदोलन, महागाई-बेरोजगारी सर्वांवर भारी ! ना प्रियंका गांधींचे ‘नाक’ ना मायावतींची ‘जात’ सगळेच सुपर फ्लॉप ठरले जनतेने कौल दिला आणि फक्त मोदी- योगिराजच हवे हे सिद्ध केले.UP ELECTION RESULT LIVE: Bhagwadhari..farmers movement, inflation-unemployment heavy on everyone! Neither Priyanka Gandhi’s ‘nose’ nor Mayawati’s ‘caste’ are all super flops … only Modi-Yogiraj …

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सुरवातीलाच ८० विरुद्ध २० हा नारा दिला. याचा अर्थ विकासाच्या, कायद्याच्या बाजूने असलेले ८० टक्के विरुद्ध राज्याची प्रगती नको असलेले २० टक्के असा योगींच्या घोषणचा अर्थ होता. मात्र, त्याचा एक अर्थ ८० टक्के हिंदू विरुद्ध २० टक्के मुस्लिम असाही काढला गेला. यातून मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.



2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बंपर विजय मिळवला होता, पण पुढच्याच वर्षी कोरोनाने दस्तक दिली आणि मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. याशिवाय देशातील महागाई आणि बेरोजगारी हाही विरोधकांनी मोठा मुद्दा बनवला होता. एकीकडे पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हा मुद्दा असल्याचे सांगितले जात होते,

तर उत्तराखंडमध्ये तीन मुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू होती. मात्र या सर्व बाबी निकालात निघाल्या नाहीत आणि शेवटी निकाल लागला, 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचा विजय, जिथे 35 वर्षांनंतर एक पक्ष पुन्हा सत्तेत येत आहे.

2000 मध्ये उत्तराखंडच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एका पक्षाने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. मणिपूरमध्ये, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि 60 पैकी 25 जागा जिंकताना दिसत आहे.

40 जागा असलेल्या गोव्यात भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे. याचाच अर्थ यावेळी भाजप 4-1 ने निवडणूक जिंकत आहे. या मोठ्या विजयामागेही मोदी जादू असल्याचे मानले जात आहे. विरोधी पक्षनेते आणि काही राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास होता की मोदी जादू कमकुवत होत आहे, परंतु निकालांनी असे सर्व दावे चुकीचे सिद्ध केले .

कल्याणकारी योजनांचा प्रभाव

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह सर्व राज्यांमध्ये भाजपकडून मोफत रेशन आणि घरे देण्याची चर्चा होती. पंतप्रधान आवास योजना, रेशन योजना आणि उज्ज्वला या सर्व योजनांचा भाजपने जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जवळपास प्रत्येक सभेत सांगत असत

की राज्यातील १५ कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. मात्र ही योजना केवळ केंद्र सरकारची आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना कामी आल्या आणि त्याचा परिणाम दिसून येत असल्याचे मानले जाते.

उत्तराखंड

2017 मध्ये उत्तराखंडमधील विजयानंतर भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री केले. पण शेवटच्या फेरीत जेव्हा परिस्थिती बदलली तेव्हा त्यांच्या जागी तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि गेल्या काही महिन्यांत त्यांनाही हटवून पुष्कर सिंह धामी यांच्याकडे कमान देण्यात आली. अशा अस्थिरतेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते,

असे मानले जात होते, पण निकाल आले तर पक्षाचा विजय झाला. सर्व अस्थिरता असतानाही पक्षाला मोठा विजय मिळाला ही मोदींची जादू असल्याचे मानले जाते. हा विजय एवढा मोठा होता की लालकुआंमधून काँग्रेसचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव झाला.

अखिलेश यादव

अखिलेख यांच्या सभांना झालेली गर्दी भाजपच्या गोटात धडकी भरवणारी होती, मात्र त्याचे मतांत आणि जागांत रुपांतर होऊ शकले नाही.अखिलेश यादव यांनी evm गडबड असल्याचे आरोपही केले मात्र सगळचं फोल ठरत फुर एक बार मोदी सरकार हे जनतेने दाखवून दिले.

प्रियंका गांधी

प्रियांका पदार्पणातच सुपर फ्लॉप

2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 30 वर्षांनंतर प्रियांकाच्या नेतृत्वाखाली सर्व 403 जागांवर उमेदवार उभे केले. ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ अशा घोषणा देत प्रियांकाने 40% महिलांना तिकिटे दिली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा निकालात काँग्रेसची कामगिरी वाईट दिसते. पक्ष 403 जागांपैकी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.

राज्यातील जनतेने प्रियांकाच्या नेतृत्वाला नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे राजकीय पदार्पण सुपरफ्लॉप ठरले आहे.

गेल्या 17 वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणाचा मोठा चेहरा असलेल्या प्रियंका यांना 2019 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले. काँग्रेसचे बुडते जहाज ती किनाऱ्यावर घेऊन जाईल, असे सर्वांना वाटत होते. पण २०२२ च्या निवडणुकीने सर्व आशा धुळीस मिळवल्या. जवळपास दोन दशके जपून ठेवलेले काँग्रेसचे ट्रम्प कार्ड पहिल्याच डावात कसे व्यर्थ गेले.

प्रियांकाचे नाक इंदिरा गांधी यांच्या सारखे आहे त्या दिसतात आजिसरख्या मात्र आजीसारखं नेतृत्वगुण त्यांच्याकडे नाही .त्या सपशेल फेल ठरल्या आहेत . जनतेला प्रियांकाच्या चेहऱ्यावर आजी इंदिराजींची झलक दिसली मात्र ते फक्त मृगजळच ठरलं.

‘मी मुलगी आहे, मी लढू शकते’ अशा घोषणा देत त्यांनी ४० टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी प्रियांकाने २०९ रॅली आणि रोड शो केले. यावेळी त्यांनी लखीमपूर हिंसाचार, हाथरस घटना, रोजगार आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून योगी सरकारला वेगवेगळ्या मंचावरून घेरले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सचिन पायलट यांनीही येऊन यूपीमध्ये रॅली काढली. प्रियांकांनी 42 रोड शो केले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी एकूण 167 सभा आणि जाहीर सभा घेतल्या. पण परिणामांनी सर्व मेहनत उध्वस्त केली.

प्रियांका गांधींच्या ‘लडकी हूं लड सकती हूं…’ या प्रचाराला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे भाजपचे काम अधिकच सोपे झाले.

मायावती

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायवती यांनी अत्यंत कमी प्रमाणात केलेला प्रचार भाजपच्या पथ्यावर पडलेला दिसला. यादव आमदारांकडून होणाऱ्या त्रासापासून आपल्याला केवळ बसप वाचवू शकतो, असा विश्‍वास दलित मतदारांना होता. बसप बाजूला राहिल्याने या मतदारांनी भाजपला साथ दिली असणार, असेच दिसते.

थेट राम मंदिर किंवा हिंदूत्वाचे कार्ड न खेळता भाजपने मिळवलेले यश अनेक अर्थांनी वगेळे ठरते. कोरोना काळात झालेला दुरवस्था, बेरोजगारी, योगींबद्दल पक्षातच असलेली नाराजी अशा अनेक गोष्टींवर मोदी-योगी जोडीने केलेली विकासकामे व कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीने मात केली. पश्‍चिम उत्तर प्रदेशात असलेली कमतरता पूर्वांचलमध्ये भरून निघाली व भाजपच्या पारड्यात घवघवीत यश पडले.

रोजगार योदी-मोदीच देतील!

उत्तर प्रदेशातली युवकांची सर्वांधिक मोठी मागणी राज्यातच रोजगार मिळावा ही आहे. येथील युवकांशी बोलताना त्यांनी आता राज्य विकासाच्या मार्गावर असून, योगींना पुन्हा संधी दिल्यास मोदी-योगी ही जोडी आम्हाला निश्‍चित रोजगार मिळवून देतील असे सांगितले. कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याने आणि पायाभूत विकासाची कामे होत असल्याने आमच्या राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील,

असा विश्‍वास या युवकांना होता. भविष्यात उत्तर प्रदेश देशाच्या विकासाचे मॉडेल बनेल, असा विश्‍वास बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक दया त्रिपाठी यांनी व्यक्त केला होता. पुढील पाच वर्षांत ही परिस्थिती निर्माण करण्याचे मोठे आव्हान मोदी-योगी जोडीसमोर असेल.

UP ELECTION RESULT LIVE: Bhagwadhari..farmers movement, inflation-unemployment heavy on everyone! Neither Priyanka Gandhi’s ‘nose’ nor Mayawati’s ‘caste’ are all super flops … only Modi-Yogiraj …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात