उत्तर प्रदेश आणि गोव्यातल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आनंदी गोपाळ चित्रपटातले गाणे “लाटा लाटा लाटा ग, उरात 100 लाटा ग”… या गीताचे विडंबन करून असे म्हणता येईल, की “नोटा नोटा नोटा ग, नुसत्या बाष्कळ कोट्या ग…!!”, नेमकी अशीच अवस्था आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची झाली होती. Shiv Sena and NCP are in dire straits in Uttar Pradesh and Goa elections
शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठ्या हिकमतीने उत्तर प्रदेश आणि गोव्यात आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले होते, पण दोन्हीकडे “नोटा”पेक्षा मते कमी पडली उमेदवारांची डिपॉझिटे जप्त झाली आणि महाराष्ट्रातल्या आणि सत्तेवरचे गंडांतर गडद झाले. अशा स्थितीत संजय राऊत आणि शरद पवार यांनी जोरदार शाब्दिक कोट्या करत पत्रकारांच्या प्रश्नांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे मात्र दिली आहेत.
– विरोधकांनी खचू नये : पवार
पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला आहे. भाजपचा विजय झाला असला तरी महाविकास आघाडीच्या सरकारवर काही परिणाम होणार नाही. भाजपा स्वबळावर सत्तेवर येण्याची महाराष्ट्रात स्वप्न पाहत असले, तरी अडीच वर्ष अजून सरकार टिकणार आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मात्र शरद पवारांना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक प्रचाराला का गेले नाहीत??, स्टार प्रचारकांच्या यादीचे काय झाले??, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना “नोटा”पेक्षा कमी मते का मिळाली??, असे प्रश्नच विचारले गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत…!!
पण संजय राऊत यांनी मात्र शिवसेनेला “नोटा”पेक्षा कमी या प्रश्नावर शाब्दिक कोट्या करत उत्तर दिली आहेत. भाजपच्या नोटांमुळे आम्हाला “नोटा”पेक्षा कमी मते मिळाली. त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही. काम करत राहू, असे उत्तर दिले. आम्ही पराभव पचवू. पण त्यांना विजय पचवता आला पाहिजे. राज्याराज्यांमध्ये त्यांनी जे सूडाचे राजकारण चालवले आहे ते बंद केले पाहिजे, अशा शाब्दिक कोट्या करत संजय राऊत यांनी भाजपला टोचले.
एकूण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. त्यावर संजय आणि शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे “झाकून” दुसऱ्या पक्षाकडे म्हणजे भाजप आणि काँग्रेसकडे “वाकून” मात्र बघितले आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App