उत्तर महाराष्ट्राशी सापत्नभाव; पूरग्रस्तांच्या निधीवरून छगन भुजबळ – सुहास कांदे भर बैठकीत खडाजंगी; पण राजकीय वैर जुनेच!!


प्रतिनिधी

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उत्तर महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांची आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भर बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. दक्षिण महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूरला पूर आला तर ताबडतोब मदत दिली जाते. मग उत्तर महाराष्ट्राला सापत्नभाव का?, असा खडा सवाल शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भर बैठकीत विचारल्यावर भुजबळ खवळले. त्यांनी सुहास कांदे यांना समज देण्याच्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यावर सुहास कांदे देखील खवळले त्यांनी पालकमंत्री यांना जशास तसे उत्तर दिले. Chagan Bhujbal and Suhas Kande heated exchange in meeting

शासकीय बैठकीत हा प्रकार घडल्याने हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय चर्चेचा बनला आहे. छगन भुजबळ एकेकाळचे शिवसैनिक असले तरी आता ते राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेना स्टाईलमध्ये सुहास कांदे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण सुहास कांदे तर शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनीही छगन भुजबळ यांना जशास तसे उत्तर दिले. दक्षिण महाराष्ट्रात सांगली कोल्हापूरला पूर आल्यावर ताबडतोब मदत दिली जाते त्याच निकषावर उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना निधी द्या ना…!!, ही मागणी सुहास कांदे यांनी आक्रमकपणे केली. भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भर बैठकीत खडाजंगी उडाली. कांदे समर्थकांनी यावेळी पालकमंत्र्यांनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.



महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मांडीला मांडी लावून सत्तेवर बसले आहेत पण नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे उभे वैर आहे. त्यातच छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून सुहास कांदे यांनी निवडणुकीत पाडले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचा सुहास कांदे यांच्यावर विशेष राग आहे. पण आता शिवसेनेचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांना काम करावे लागत असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

त्याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादीचे पालकमंत्री आपले ऐकत नाही. ही भावना नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये प्रबळ होते आहे. त्याचाच विस्फोट सुहास कांदे यांच्या रूपाने आज भर शासकीय बैठकीत बघायला मिळाला.

Chagan Bhujbal and Suhas Kande heated exchange in meeting

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात