India Fights Back : केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, इतर राज्यांपेक्षा दुप्पट

Central Govt supply 1784 metric tonnes of oxygen to Maharashtra, double than other states

1784 metric tonnes of oxygen to Maharashtra : कोरोना महामारीच्या या भीषण संकटात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, व्हेंटिलेटर्स, रेमडिसिव्हीर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राने शब्द दिल्याप्रमाणे महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे. याचबरोबर एप्रिलअखेरपर्यंत राज्याला 4 लाख 35 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनही उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर या दोन्हींबाबतीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला झुकते माप दिल्याचे स्पष्ट होते.  Central Govt supply 1784 metric tonnes of oxygen to Maharashtra, double than other states


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीच्या या भीषण संकटात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, व्हेंटिलेटर्स, रेमडिसिव्हीर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राने शब्द दिल्याप्रमाणे महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे. याचबरोबर एप्रिलअखेरपर्यंत राज्याला 4 लाख 35 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनही उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर या दोन्हींबाबतीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला झुकते माप दिल्याचे स्पष्ट होते.

आतापर्यंत राज्य सरकारतर्फे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरवरून केंद्रावर अनेक आरोप झाले आहेत. ऑक्सिजन ते लसींचा पुरवठा अशा जवळपास सर्वच बाबतींत राज्याने केंद्राकडे मागितली. त्यावर केंद्राने लागलीच उपाययोजना करून राज्याला पुरवण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आला आहे. हे प्रमाण गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा प्रमुख राज्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत.

Central Govt supply 1784 metric tonnes of oxygen to Maharashtra, double than other states

 

Central Govt supply 1784 metric tonnes of oxygen to Maharashtra, double than other states

 

एवढेच नाही, ऑक्सिजनची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम केअर्स फंडमधून संपूर्ण देशभरात ५५१ पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. पीएसए ऑक्सिजन प्रकल्प सरकारी रुग्णालयांत उभारण्यात येणार असून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यांत ते असतील. यामुळे कठीण काळातही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. एक पीएसए प्लांट उभारण्यासाठी अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांचा खर्च येतो. हे पीएसए प्लांट अवघ्या चार आठवड्यांत उभारता येऊ शकतात. पीएसए प्लांटमध्ये हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो थेट रुग्णालयात पुरवण्याची क्षमता असते. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेमुळे आता ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न लवकरच इतिहासजमा होणार आहे.

Central Govt supply 1784 metric tonnes of oxygen to Maharashtra, double than other states

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात