शासनाचा पैसा मिळेना, आमदाराने स्वत:ची ९० लाखांची एफडी मोडून रुग्णांसाठी घेतले ५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन

Shiv sena MLA Santosh Bangar Broke His Own Rs 90 Lakh FD To Buy 5000 remdesivir Injections For District

Shiv sena MLA Santosh Bangar : ‘शासनाचे काम अन् बारा महिने थांब’ याचा प्रत्यय अशा कोरोना संकटाच्या काळात यावा, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अवघ्या देशात सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मोठी मारामार सुरू आहे. हिंगोलीत लालफीतशाहीमुळे रेमडेसिव्हिरची थेट विक्री शक्य नसल्याने शिवसेना आमदार संतोष बांगर रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी स्वत:ची 90 लाखांची एफडी मोडून रेमडेसिव्हिर खरेदीसाठी ती खासगी वितरकाला उपलब्ध करून दिली. या माध्यमातून जिल्ह्यात 5 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. आमदार बांगर यांच्या या कौतुकास्पद कामामुळे अनेक अतिगंभीर रुग्णांना जीवदान मिळू शकेल. Shiv sena MLA Santosh Bangar Broke His Own Rs 90 Lakh FD To Buy 5000 remdesivir Injections For District


विशेष प्रतिनिधी

हिंगोली : ‘शासनाचे काम अन् बारा महिने थांब’ याचा प्रत्यय अशा कोरोना संकटाच्या काळात यावा, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अवघ्या देशात सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मोठी मारामार सुरू आहे. हिंगोलीत लालफीतशाहीमुळे रेमडेसिव्हिरची थेट विक्री शक्य नसल्याने शिवसेना आमदार संतोष बांगर रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी स्वत:ची 90 लाखांची एफडी मोडून रेमडेसिव्हिर खरेदीसाठी ती खासगी वितरकाला उपलब्ध करून दिली. या माध्यमातून जिल्ह्यात 5 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. आमदार बांगर यांच्या या कौतुकास्पद कामामुळे अनेक अतिगंभीर रुग्णांना जीवदान मिळू शकेल.

कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक महाराष्ट्रात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन व रेमडिसिव्हिरचा प्रचंड तुटवडा आहे. कित्येकांना यामुळे प्राण गमवावे लागत आहेत. हिंगोलीतही याहून वेगळी परिस्थिती नाही. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. यावर बांगर यांनी आपली एफडी मोडून मदत केली आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवण्यासाठी वितरकांना मोठी रक्कम अडकवून ठेवावी लागते. शासनाकडून वेळेत रकमेची परतफेड होत नाही, यामुळे त्यांना व्याजाचा भुर्दंडही सहन करावा लागतो. यामुळे रकमेअभावी रेमडेसिव्हिरची मागणी नोंदवण्यास वितरकही हतबल होऊन जातात. ही अडचण जेव्हा आ. बांगर यांना समजली तेव्हा त्यांनी स्वतःची ९० लाखांची एफडी मोडून खाजगी वितरकाला रक्कम उपलब्ध करून दिली. यातून आता हिंगोली जिल्ह्याला 5 हजार रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळणार आहेत. आता जेव्हा जिल्हा प्रशासन वितरकाला निधी देईल, तेव्हा ती रक्कम आमदार बांगर यांना देण्यात येणार आहे.

Shiv sena MLA Santosh Bangar Broke His Own Rs 90 Lakh FD To Buy 5000 remdesivir Injections For District

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था