राज्यपालांना बदनाम करून पवार – ठाकरे यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींना पपलू केले!!; किरीट सोमय्या यांचा टोला


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात झाली नाही. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री अशी “राजकीय पत्रापत्रीची लढत” यात झाली. परंतु त्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ करून एका वेगळ्याच मुद्द्याला तोंड फोडले आहे.By discrediting the Governor, Pawar-Thackeray slammed Rahul Gandhi of Congress !!; Tola of Kirit Somaiya

राज्यपालांना बदनाम करून किंवा राज्यपालांच्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्ष होऊ दिले नाही, असा टोला किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.या व्हिडिओत किरीट सोमय्या म्हणतात, की विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक गुप्त आवाजी मतदानाने घेण्याचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाटक केले. गुप्त मतदानाने निवडणूक झाली असती तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार होते.

भाजपकडे 105 आमदार होते. त्यामुळे आघाडीचाच अध्यक्ष झाला असता. परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होणे नको होते. त्यामुळे दोघांनी मिळून राज्यपालांना बदनाम करून आणि

राज्यपालांच्या आडून काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पपलू बनवले. किरीट सोमय्या यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे त्यांच्या व्हिडिओ राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

By discrediting the Governor, Pawar-Thackeray slammed Rahul Gandhi of Congress !!; Tola of Kirit Somaiya

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण