मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आनंदराव अडसूळ यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

वृत्तसंस्था

मुंबई : अमरावतीतील 980 कोटींच्या सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे समन्स रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका हे शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, ही याचिका हायकोर्टाने आता फेटाळून लावली आहे. Bombay High Court rejects Shiv Sena leader Anandrao Adsul in his plea seeking quashing of summons issued by Enforcement Directorate in an alleged money laundering case

त्यामुळे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स लागू होऊन चौकशी आणि तपास याला सामोरे जावे लागणार आहे. याआधी ईडीने समन्स पाठवताच आनंदराव अडसूळ यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात संबंधित समन्स रद्द व्हावे या मागणीसाठी धाव घेतली होती. परंतु हायकोर्टाने अडसूळ यांची याचिका फेटाळून लावली आहे.

980 कोटींच्या सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग केस आहे. या केसच्या चौकशी आणि तपासासाठी सक्तवसुली संचालनालयाने अमरावती आणि मुंबईत त्यांच्या कार्यालयावर आणि घरांवर छापे घातले होते. त्यानंतर या दोघांनाही चौकशी आणि तपासला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. परंतु, आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

Bombay High Court rejects Shiv Sena leader Anandrao Adsul in his plea seeking quashing of summons issued by Enforcement Directorate in an alleged money laundering case

महत्त्वाच्या बातम्या