वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. Shiv Sena’s Dussehra rally will be held in Shanmukhanand Hall: Sanjay Raut
मेळावा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.शिवसेना पक्षाकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. हा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेसाठी खूप महत्वाचा असतो. त्याचसोबत शिवसेनेचा दसरा मेळावा हा फक्त पक्षापुरता मर्यादित नसून त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेले असते. मागच्या वर्षी कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला होता. यावर्षी दसरा मेळावा कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनच्या या दसरा मेळाव्याबाबत खासदार संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. यावर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने हा दसरा मेळावा होणार आहे.
दसरा मेळाव्याच्या जागेसंदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थवर नाही तर षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे मंत्री वरिष्ठ नेते, उपनेते, आमदार, महापौर आणि काही नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील.’ आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App