दसरा मेळावा : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाची परवानगी ; मुंडे समर्थकांचा आनंद गगनात मावेना


लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. Dussehra Melava: Permission of administration for Pankaja Munde’s Dussehra Melawa; The joy of Munde supporters is sky high


विशेष प्रतिनिधी

बीड : दसरा जवळ येत आहे. यादरम्यान राज्यातील तीन दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या तीन दासऱ्यांमध्ये नागपूरच्या संघ मुख्यालयात होणारा दसऱ्याचा कार्यक्रम त्यानंतर भगवान भक्ती गडावर होणारा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आणि तिसरा म्हणजे शिवसेनेचा मुंबईमध्ये होणारा दसरा मेळावा.या तिन्ही दसरा मेळाव्याला प्रशासनाकडून परवांगी मिळाली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रशासनची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांसह मुंडे समर्थकांचा उत्साह गगनात मावेना.

यंदा प्रशासनाच्या परवानगी दसरा मेळावा भव्य होणार हे निश्चित आहे. भगवान भक्ती गडावरून पंकजा मुंडे या ऊसतोड कामगार आणि मुंडे समर्थकांना मार्गदर्शन करतात, दिवाळीनंतर जिल्ह्यातील जवळपास पाच लाखांहून ऊसतोड मजूर स्थलांतर करून ऊस तोडणीसाठी जातात, त्या पूर्वी या दसरा मेळाव्याच्या आयोजनाची परंपरा आहे.



लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यात येत आहे. १५ ऑक्टोबर रोजी दसरा असून मेळाव्याची पूर्ण तयारी केली जात आहे.

अंमळनेर पाेलिसांनी कोरोना नियमांची अट घालून ही परवागनी दिली आहे. आता या मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार आणि पंकजा मुंडे काय बोलतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनातून कार्यकर्त्यांना केले आहे.

अटीसह परवानगीकोरोना नियमांचे पालन करण्याची अट घालून सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. गर्दी जमवू नये, सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावण्याचे आवाहन करण्याबाबतही सुचना केल्या आहेत.

Dussehra Melava: Permission of administration for Pankaja Munde’s Dussehra Melawa; The joy of Munde supporters is sky high

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात