विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची नियुक्ती मंगळवारी झाली. उच्च शिक्षण सचिव पदावरून ते ३० सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत.Amit Khare is now the new advisor to Prime Minister Narendra Modi
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासंबंधीचा आदेश आज जारी करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर केली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर असतील, असे आदेशात म्हटले आहे.
अमित खरे हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) १९८५च्या तुकडीतील झारखंड कॅडरचे निवृत्त अधिकारी आहेत. सुमारे ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी केंद्र सरकारसह झारखंड आणि बिहार सरकारच्या प्रशासनात जबाबदारीची पदे भूषविली आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत असलेले चारा गैरव्यवहाराचे प्रकरण खरे यांनीच उघडकीस आणले होते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी या प्रकरणी प्रथमच ‘एफआयआर’ची नोंद केली होती.
अत्यंत कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ३४ वर्षांत नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका होती. त्याचबरोबर डिजिटल मीडिया संबंधित नियमांत महत्त्वाचे बदल करण्या तही त्यांचा हातभार लागलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App