विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा घोषित केली होती.Now Pune-Mumbai helicopter service will start, the journey will be in just 40 minutes
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे- मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे.ही सेवा खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे देण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरने ४० मिनिटांतच पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे. ही हेलिकॉप्टर सेवा दररोज खर्डी ते जुहू अशी सुरू असेल.विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा घोषित केली होती.
पुणे ते मुंबईसाठी हेलिकॉप्टर प्रवास करायला एका व्यक्तीला १५०० रुपये तिकीट असेल. दररोज सकाळी ९.३० वाजता खर्डी आणि जुहूतून संध्याकाळी ४.३० वाजता हेलिकॉप्टर निघेल. पुणे ते मुंबई दरम्यान Blade ही एकमेव खाजगी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे.
एयर इंडिया पुणे स्टेशनचे माजी प्रभारी धैर्यशील वंदेकर यांनी सांगितलं की , हा प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरेल. पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App