आता लवकरच पुण्यात धावणार पीएमपीच्या वातानुकूल कॅब ; रिक्षापेक्षाही असणार कमी भाडे

ओला उबेरप्रमाणे पीएमपी देखील वातानुकूलित कॅब सेवा सुरू करणार आहे.PMP’s air-conditioned cab to run in Pune soon; Fares will be lower than rickshaws


विशेष प्रतिनिधी

पुणे : सध्याच्या बदलत्या काळानुसार पीएमपी स्वतःच रूप बदलत आहे. काही दिवसांपूर्वीच पीएमपीने आपल्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक बसचा समावेश होता.आता ओला उबेरप्रमाणे पीएमपी देखील वातानुकूलित कॅब सेवा सुरू करणार आहे.विशेष म्हणजे यासर्व ई कॅब असल्याने प्रदूषण देखील टळणार आहे.

कधी येणार पीएमपीएमएलची कॅब सेवा

प्रशासनाकडून देण्यात आली आहे की , येत्या सहा महिन्यात पीएमपीएमएलची (PMPML) कॅब सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.रिक्षापेक्षाही कमी भाडे

पीएमपीएमएल सुरुवातीला शंभर कॅब या स्वतःच्या मालकीच्या घेणार आहे आणि अजून शंभर कॅब भाडे तत्वावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॅबचे भाडे हे रिक्षापेक्षाही कमी असणार आहे. म्हणजेच १० रुपये प्रति किलोमीटर ठेवले अस भाड राहणार आहे. या १०० कॅबसाठी जवळपास १२
कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.

पीएमपीएमएलच्या सह संचालक चेतना केरूर म्हणाल्या की, “खासगी कॅबप्रमाणे पीएमपीकडून देखील या कॅब सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या या योजनेवर नागरिकांचे मत काय आहे हे जाणून घेण्यात येणार आहे.नंतर संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृत निर्णय घेईला जाईल.”

PMP’s air-conditioned cab to run in Pune soon; Fares will be lower than rickshaws

महत्त्वाच्या बातम्या