Thalaivi

कंगणाचा थलाइवी सिनेमाला पाकिस्तानी प्रेक्षकांनी दर्शवली पसंती! कंगना बोलली असे काही ज्याने पुन्हा नवी कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकते

विशेष प्रतिनिधी

मुबंई : अभिनेत्री कंगना रणावतची प्रमुख भूमिका असणारा थलायवी हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कंगनाची अक्टिंग, चित्रपटाचा प्लॉट, चित्रपटाची कथा या सर्वच गोष्टींचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.

Kangana’s Thalaivi movie liked by Pakistani audience! Kangana said something that could lead to a new controversy

हा चित्रपट तामिळनाडूच्या फॉर्मर चीफ मिनिस्टर जयललिता यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. जयललिता सुरुवातीला अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. हा प्रवास या चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्टरीत्या मांडण्यात आला आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप टेन सर्वात जास्त पाहिलेल्या सिनेमांमध्ये या चित्रपटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आता अशी बातमी येत आहे की, पाकिस्तानमधून देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यासाठी पाकिस्तानचे आभार मानणारी एक पोस्ट कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘Thalaivii is trending on top in many countries, including Pakistan. art has no barriers. with love from India ‘अशा शब्दांमध्ये कंगणाने ग्रॅटिट्यूड व्यक्त केला आहे.

तर गोष्ट कंगनाची आहे, मग कॉन्ट्रोव्हर्सी तर आलीच. कंगनाने आपल्या पुढील पोस्टमधून अतिशय खोचक शब्दांत पाकिस्तानी फॅन्सना टार्गेट केले आहे. ती लिहिते, ‘On a lighter note,  jan ke rasal ki hue deshadrohi sirf isi desh mai nahi hai.’ कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर आता मीडियामध्ये कोणते नवे वादळ येते हे पहावे लागेल.

Kangana’s Thalaivi movie liked by Pakistani audience! Kangana said something that could lead to a new controversy

 

महत्त्वाच्या बातम्या