९४० कोटींचा चारा घोटाळा बाहेर काढण्यास कारणीभूत ठरलेले अमित खरे पंतप्रधान मोदींचे नवे सल्लागार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारांच्या टीम मध्ये एक महत्त्वपूर्ण भर पडली असून त्यामध्ये 1985 च्या बॅचचे आएएस अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी नियुक्ती असून त्यांनी कार्यभार स्वीकारताच ही नियुक्ती लागू होईल.Appointments Committee of the Cabinet has approved appointment of Amit Khare as Advisor to the Prime Minister

अमित खरे हे बिहार केडरचे आयएएस अधिकारी असून बिहारमध्ये 940 कोटींचा चारा घोटाळा बाहेर काढण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते बिहारमध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असताना त्यावेळचे अर्थ सचिव एस. के. दुबे हे काही घोटाळ्यांचा संदर्भात तपास करत होते. त्यावेळी कोणत्या खात्यांनी माहिती न देता परस्पर मोठ्या रकमा काढल्या आहेत याचा तपास करण्यात येत असताना वैशाली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने दहा कोटी आणि नऊ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम कोणतीही माहिती वरिष्ठांना न देता काढल्याचे अमित खरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर खऱ्या अर्थाने चारा घोटाळ्याचा पर्दाफाश व्हायला सुरुवात झाली, असे मानण्यात येते.

दहा आणि नऊ कोटी रुपयांच्या रकमा काढल्याच्या प्रकरणातून उघडकीस आलेला हा चारा घोटाळा 940 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आणि जगन्नाथ मिश्रा आणि लालूप्रसाद यादव यांच्या काळात हा संपूर्ण घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. या दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगवास भोगावा लागला.  या घोटाळ्याच्या तपासादरम्यान अमित खरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

अमित खरे हे केंद्र सरकार मध्ये शिक्षण खात्याचे सचिव देखील राहिले आहेत. शिक्षण विषयक क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष रस असल्याचे सांगितले जाते. ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले आहेत.

Appointments Committee of the Cabinet has approved appointment of Amit Khare as Advisor to the Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात