काँग्रेसच्या उद्या दोन राजकीय मोहिमा; राष्ट्रपतींची भेट आणि बांगलादेश निर्मितीचे फोटो प्रदर्शन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस सध्या भाजप विरोधामध्ये आक्रमक मूडमध्ये आहे. या आक्रमकतेतूनच पक्षाने लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला आहे. उद्या ता. 13 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सात जणांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. प्रियांका गांधी या शिष्टमंडळाच्या प्रमुख सदस्य असतील. Two political campaigns of the Congress tomorrow; President’s visit and photo exhibition of Bangladesh’s creation

लखीमपूर हिंसाचारास जबाबदार धरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांचा मुलगा अमित मिश्रा यांच्यासह सर्व दोषींना कठोर शिक्षा करावी ही मागणी घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

तर दुसरीकडे उद्याच अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात संदर्भातले तसेच बांगलादेश निर्मिती संदर्भातले फोटो प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर युद्धामध्ये मात करत स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. काँग्रेससाठी इंदिराजींचा हा वारसा अभिमानास्पद आहे. याच संदर्भातील फोटो प्रदर्शन काँग्रेसच्या मुख्यालयात लावण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन करून सोनिया गांधी तो विजय भारतीय जनतेला समर्पित करतील.

काँग्रेसच्या दृष्टीने लखीमपूर हिंसाचार आणि बांगलादेश निर्मिती हे दोन मुद्दे आगामी उत्तर प्रदेश पंजाब यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरतील, असा पक्षाच्या नेत्यांचा होरा आहे. त्यामुळेच काँग्रेस आता या दोन राजकीय मोहिमांवर निघालेली दिसत आहे.

Two political campaigns of the Congress tomorrow; President’s visit and photo exhibition of Bangladesh’s creation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात