काँग्रेस – शिवसेना राजकीय साम्य; दुखणे आहे डोक्याला, औषध लावतात पायाला!!


काँग्रेस आणि शिवसेना हे दोन संपूर्णपणे परस्परविरोधी राजकीय संस्कृतीतले पक्ष सध्या ज्या विशिष्ट राजकीय फेज मधून चालले आहेत, ते पाहता दोन्ही पक्षांना “दुखणे आहे डोक्याला आणि औषध लावतात पायाला” हा मराठी वाक्प्रचार चपखल लागू होताना दिसतो आहे आहे…!!Congress-Shiv Sena political similarities; There is pain in the head, the legs get rid of the medicine

दोन्ही पक्षांची राजकीय संस्कृती पूर्णतः भिन्न असली तरी “ऑपरेटिव पार्ट”च्या बाबतीत म्हणजे निर्णय प्रक्रियेत दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांमध्ये विलक्षण साम्य आहे. काँग्रेस जशी गांधी परिवाराभोवती केंद्रित आहे, तशी शिवसेना ठाकरे परिवाराभोवतीच केंद्रित आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे जे काही निर्णय होतील ते निर्णय फक्त आणि फक्त गांधी आणि ठाकरे कुटुंबीयच घेऊ शकतात ही राजकीय वस्तुस्थिती आहे.



पण मूळ मुद्दा यापेक्षा भिन्न आहे. तो म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना सध्याच्या राजकीय समस्यांमध्ये साम्य आहे. काँग्रेसमध्ये जी 23 गटाचे नेते पक्षांतर्गत सुधारणा करून पक्ष नेतृत्वामध्ये काही बदल करू इच्छितात. तर काँग्रेसचे गांधी परिवाराचे नेतृत्व वेगळ्या दिशेने जाऊ इच्छिते.जी 23 गटाच्या नेत्यांचे पक्षाच्या राजकीय तत्त्वज्ञानाशी त्यांचे अजिबात भांडण नाही. उलट काँग्रेसच्या राजकीय धर्मनिरपेक्षतेशी ते निष्ठावान नेते आहेत. त्यांचे गांधी परिवाराविरुद्ध देखील बंड नाही. त्यांना पक्ष फक्त काँग्रेसमध्ये राजकीय जान आणण्यासाठी सुधारणा घडवून आणायची आहे. पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जी 23 गटाच्या नेत्यांकडे लक्ष देण्यापेक्षा वेगळ्या मार्गाने आपला पक्ष बळकट करू इच्छित असल्याचे दिसत आहे.

त्यातला एक भाग आधी पूर्ण झाला आहे. त्यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुण विद्यार्थी नेत्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. लखीमपूर हिंसाचारावर अतिरिक्त लक्ष केंद्रित करून पक्षाला फारसा फायदा होणार नाही. त्याऐवजी पक्षाच्या संरचनेत बदल करा,म. संघटनात्मक मजबुतीसाठी काम करा, असा सल्ला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी दिला आहे. परंतु या सल्ल्याकडे प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी दुर्लक्ष करून लखीमपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आज प्रियांका गांधी प्रत्यक्ष लखीमपूरला गेल्या आहेत, तर राहुल गांधी उद्या सात नेत्यांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची याच मुद्द्यावर भेट घेणार आहेत. याचा अर्थ असा की काँग्रेसचे मूळ दुखणे हे पक्ष संघटनात्मक पातळीवरचे आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काही कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. पण ती करण्याऐवजी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व पक्षाला वेगळ्या दिशेने नेऊ इच्छित असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य मराठी भाषेतील वाक्प्रचारानुसार हे “दुखणे आहे डोक्याला, पण औषध लावतात पायाला” असे करण्यासारखे आहे…!!

जे काँग्रेसचे तेच शिवसेनेचे…!! शिवसेनेत सध्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री असूनही आमदारांची कामे होत नाहीत. निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार उघडपणे दूजाभाव करतात असे आरोप शिवसेनेच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन केले आहेत. अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीशी संबंध तोडून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात स्पर्धक आहेत. तिथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी सूत जुळणे शक्य नाही. तरी देखील शिवसेनेचे नेतृत्व दामटून शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना आणि शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जुळवून घेणे भाग पाडत असल्याचे दिसत आहे. त्यातून शिवसेनेमध्ये अस्वस्थता अधिक ठळक होत चाललेली दिसत आहे.

यामध्ये आता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांची भर पडली आहे. अनंत गीते, रामदास कदम ही उघडपणे समोर आलेली नावे आहेत. पण उघडपणे समोर न आलेली नावे अधिक आहेत आणि ती राजकीय दृष्ट्या देखील सक्रिय असलेली दिसतात. अशा स्थितीत मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत हे भाजपला ठोकून काढण्याच्या राजकारणावर विश्वास ठेवताना दिसतात.

सध्या त्यांनी भाजपला राजकीय दृष्ट्या ठोकून काढण्यात काही गैर मानता येणार नाही, पण प्रत्यक्षात शिवसेनेच्या आमदारांचे, नेत्यांचे आणि शिवसैनिकांचे राजकीय वैर आणि स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असताना त्यावर ते कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. शिवसेना आमदारांना अधिक निधी देण्यासाठी ते अजित पवारांना भागही पाडत नाहीत. त्याऐवजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आपल्या तोफा भाजपवर केंद्रित करताना दिसतात. इथेच शिवसेनेची मूळ समस्या आहे. आणि हेच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय साम्य असल्याचे दिसून येत आहे.

Congress-Shiv Sena political similarities; There is pain in the head, the legs get rid of the medicine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात