वृत्तसंस्था
मुंबई – राज्यात कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनसह सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांना भाजपने पाठिंबा दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. BJP to support thackery – pawar govt decision of weekend lockdown
राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, की राज्य सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार – रविवारी संपूर्ण लॉकडाउन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध असे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो, की या संपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत जनतेने सहकार्य करावे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केले आहे, की आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहीमेत भाजपाचे कार्यकर्ते सक्रीयतेने सहभागी होतील. हा देखील निर्णय आम्ही घेतला आहे.
BJP supports govt's decision to impose lockdown. People should abide by restrictions & follow COVID protocols. To ensure maximum vaccination, BJP workers would help people register and reach vaccination centers: Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/VL4V3OySLN
— ANI (@ANI) April 4, 2021
कोरोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. माझ्या माहिती प्रमाणे आज जवळजवळ ५७ हजार केसेस कोरोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्याप्रमाणात मृत्यूसंख्या देखील वाढते आहे. कोरोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशापरिस्थितीत ज्या काही उपाययोजना सरकारच्यावतीने केल्या जातील, त्या उपाययोजनांना सहकार्य करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आम्ही समजतो.” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
BJP to support thackery – pawar govt decision of weekend lockdown
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची