मोबाइल चोरणाऱ्या सराईतांना अटक


गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे – गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पोलीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.Bangarden police Arrested mobile theft accused and recovered ४६ mobiles

सद्दाम कासीम शेख (वय २३ रा. कोंढवा) आणि अनिल ऊर्फ आन्या अरुण बोबडे (वय २७ रा. कँप) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार राठोड (रा. कात्रज) हे कुटूंबियासह १६ एप्रिलला सकाळी सातच्या सुमारास पायी चालले होते. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून नेला.



याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला असता ते सराईत सद्दाम आणि अनिल असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही चोरटे पुणे स्टेशन परिसरात आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाखांवर ४६ मोबाइल जप्त करण्यात आले.

Bangarden police Arrested mobile theft accused and recovered ४६ mobiles

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात