बाळासाहेब म्हणाले होते, “गयाराम” आमदारांना रस्त्यात तुडवा!!: संजय राऊतांनी उडवली काँग्रेस उमेदवारांच्या शपथविधीची खिल्ली


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना मंदिरे, मशिदी, आणि चर्चमध्ये नेऊन शपथविधी कार्यक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ काँग्रेसने या उमेदवारांना दिली आहे.  Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे. आमदारांच्या पक्षांतरासाठी जनता देखील थोडी जबाबदार आहे. कारण ते पक्षांतर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करून आमदार करत असतात. अशावेळी पक्षांतर करणाऱ्या आमदाराला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी तुडवा, असे आदेश बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली आहे.



पक्षांतर करणाऱ्या आमदारांना भररस्त्यात तुडविण्याची बाळासाहेबांची ही आठवण सांगून संजय राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.

Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात