रोहिणी खडसे यांच्या गाडीवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध ; चंद्रकांत पाटील विधानसभेत आवाज उठविणार


विशेष प्रतिनिधी

जळगाव -राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेचा निषेध मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. Attack On Rohini Khadse’s car Strongly condemned by chandrakant patil

या घटनेबाबत मी विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसापासून मुक्ताईनगरचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार चंद्रकांत पाटील विरुद्ध एकनाथराव खडसे असे समीकरण बनले आहे, एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. असे असतानाच काल रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञात इसमाने हल्ला केला आहे. या हल्ल्याचा चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.



  • रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला
  •  हल्ल्याचा चंद्रकात पाटील यांच्याकडून तीव्र निषेध
  • चंद्रकात पाटील विधानसभेत आवाज उठविणार

Attack On Rohini Khadse’s car Strongly condemned by chandrakant patil

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात