विधानसभा अध्यक्ष निवडणूक : राहुल नार्वेकर १६४, राजन साळवी 107, 4 तटस्थ!!; शिवसेना सदस्यांनी व्हीप धुडकावल्याचे रेकॉर्डवर!!


प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणूक सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी निवडून आले. शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. 4 सदस्य राहिले. यावेळी झालेले सर्व मतदान पीठासीन अध्यक्ष नरहरी झिरवळ विधानसभा रेकॉर्डवर घेतले. Assembly Speaker Election: Rahul Narvekar 164, Rajan Salvi 107, 4 Neutral

शिवसेनेतून ३९ आमदार वेगळे करून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. त्यानंतर अनपेक्षित पणे भाजपने थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. राज्यपालांच्या आदेशानुसार रविवार, ३ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे.


विधानसभा अध्यक्ष निवडणूक : पहिली लढाई व्हीपची; शिवसेनेच्या दोन गटांची!!


विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसाठीच्या विशेष अधिवेशनाच्या सुरूवातीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव सभागृहात मांडाला. या प्रस्तावानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तो प्रस्ताव मतदानास टाकला. आवाजी मतदानात बहुमताच्या बाजूने प्रस्ताव पारित होणार इतक्यातच विरोधी पक्षाकडून पोलची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला. त्यानंतर बहुमाताच्या बाजूने असणाऱ्यांना उपाध्यक्षांच्या उजव्या बाजूला आणि बहुमाच्या प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्यांना डाव्या बाजूस येण्यास सांगितले. त्यानुसार शिरगणती सुरू करण्यात आली, यावेळी भाजपच्या राहुल नार्वेकरांना १६४ मते मिळाली.

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर या पदावर बसणाऱ्या सर्वात तरुण अध्यक्षांमध्ये ते आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि अपक्षांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचे उर्वरित आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ मतदान केले. प्रत्यक्ष मोजणीच्या आधारे शिरगणती पद्धतीने हे मतदान झाले. शिंदे गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचा व्हीप धुडकावला हे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रेकॉर्डवर घेतले त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ शूटिंग झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Assembly Speaker Election: Rahul Narvekar 164, Rajan Salvi 107, 4 Neutral

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात