चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

ashwini jagtap

महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा  ३६ हजारांहून अधिक मताधिक्क्याने केला पराभव

प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. अखेर मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल देत अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी विजयी केलं. Ashwini Jagtap of BJP won in Chinchwad Assembly by-election

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप या आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या पार पडल्यानंतर अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मतं मिळाली. याशिवाय महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. अश्विनी जगताप यांचा ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजय झाला.


Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी


पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं होतं. मात्र, मविआनं नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक झाली.

चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे नाराज होत राहुल कलाटेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचाच फटका चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.

Ashwini Jagtap of BJP won in Chinchwad Assembly by-election

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात